मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अखेर आठवले यांच्याशी चर्चा , आठवले मात्र संतापले

Foto
मुंबई : मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून ९७ उमेदवारांची नावं समोर आली आहे. या उमेदवारांना भाजपाकडून एबी फॉर्मही देण्यात आले.  भाजपाच्या या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन, आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धारावीतील वॉर्ड क्रमांक १८५ मधून राजा निवडणूक लढवणार आहेत. रवी राजा हे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. मुंबईत भाजपा १३७, तर शिंदेंची शिवसेना ९० जागा लढवणार आहे. तर आरपीआयला शिवसेना त्यांच्या ९० जागांमधून जागा देणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याशी चर्चा करीत त्यांना जागा देण्यात येतील असे सांगितले.; 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आणि शिवसेनेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाई) एकही जागा सोडण्यात न आल्याने रामदास आठवले प्रचंड संतापले आहेत. महायुतीने आपल्यासोबत विश्वासघात केला असून आपण हा अपमान कदापी सहन करणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. रामदास आठवले (ठरावरी ईंहरुरश्रश) यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली आहे. महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत.  मात्र, आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल  दुपारी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून, आज दुपारी १२ वाजता पक्षाचा अंतिम निर्णय आणि भूमिका अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.